मुलांकडून गुन्ह्याची कबुली

By Admin | Updated: April 15, 2016 23:20 IST2016-04-15T23:14:03+5:302016-04-15T23:20:33+5:30

शेवगाव : शेवगाव शहरातील अजित उर्फ सनी काटे (वय १७) या युवकाच्या मृत्यू प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Children's confession | मुलांकडून गुन्ह्याची कबुली

मुलांकडून गुन्ह्याची कबुली

युवकाचा मृत्यू : मुलांना बालन्यायालयात हजर करणार
शेवगाव : शेवगाव शहरातील अजित उर्फ सनी काटे (वय १७) या युवकाच्या मृत्यू प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या मुलांना नगर येथे बालन्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अजित काटे याच्या मृत्युचे रहस्य शेवगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडले. त्याचा मृत्यू अकस्मात नसून टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर खेळल्या गेलेल्या बेटींगमधील (सट्टा) पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले.
मयत युवकाचे वडील निलकंठ शंकर काटे यांनी फिर्यादीत व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांनी घटनेची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत अजित मंगळवारी सायंकाळी ५:३० ते ६ च्या दरम्यान मित्रांबरोबर गेला होता. तो घरी परत आला नाही. त्यादिवशी रात्री ९ वाजता तो एका मित्रासोबत होता. त्याच रात्री १० च्या सुमारास आरोपींपैकी एकाबरोबर त्याला फिरताना काहींनी पाहिले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आखेगाव रस्त्यावरील गजबजलेल्या ठिकाणी किराणा स्टोअर्सजवळ आढळला.
रात्री ११ ते पहाटे ४ च्या दरम्यान झालेल्या मारहाणीमुळे बरगड्या दबल्या जावून अजित याचा मृत्यू झाल्याचे उत्तरिय तपासणीच्या अहवालात म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून घटनेच्या आदल्या दिवशी मंगळवारी त्याच्या सोबत असलेल्या ३ अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेच्या सट्ट्याच्या व्यवहारातील सुमारे ६० हजाराची रक्कम त्याच्याकडे बाकी होती. त्यावरून वाद झाल्याचे तपासात उघड झाले.
(तालुका प्रतिनिधी)
शेवगाव व परिसरातील क्रिकेटवर खेळल्या जाणाऱ्या बेटींगची पाळेमुळे खणून काढून यासंबंधातील मुख्य गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल.
-सुरेश सपकाळे,
पोलीस निरीक्षक, शेवगाव.

Web Title: Children's confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.