शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानजोगी कुटुंबासोबत केली दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 14:20 IST

शिर्डी येथील साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानभूमीत जाऊन तेथील स्मशान जोग्याच्या कुटुंबाबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली़. 

शिर्डी : येथील साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानभूमीत जाऊन तेथील स्मशान जोग्याच्या कुटुंबाबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली़. १७ मे २०१३ रोजी स्मशानभूमीतच दोन ते सहा वयोगटातील तीन मुले-मुली बेवारस मिळाली़. त्यांना घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश दळवी यांनी अनाथाश्रमाची स्थापना केली़. सात वर्षानंतर आज या माध्यमातून १ ते १९ वयोगटातील १०४ अनाथ मुले-मुली एका कुटुंबाप्रमाणे एका छताखाली आनंदाने राहत आहेत़. जेथून आपल्या कामाचा श्रीगणेशा झाला. ती स्मशानभूमी येथील अनाथांसाठी एखाद्या मंदिराप्रमाणे आहे़. या स्मशानभूमीत गंगाराम गायकवाड व त्यांचे कुटुंब राहते़. प्रत्येक अंत्यविधीच्या वेळी रात्रीबेरात्री हे स्मशानजोगी कुटुंब नि:स्वार्थपणे मदत करत असते़. स्मशानभूमीत गेलेल्या प्रत्येकाच्या दु:खात सहभागी होणा-या या कुटुंबाचा मात्र दिवाळीसारख्या आनंदाच्या क्षणी मात्र समाजाला विसर पडतो़. त्यामुळे साईआश्रयाचे संस्थापक गणेश दळवी यांनी यंदाची दिवाळी अनाथांसह स्मशानभूमीत साजरा करण्याचा निर्णय घेतला़.दळवी यांनी अनाथालयातील मुलांसह स्मशानभूमीत जाऊन दिवे लावले. गायकवाड कुटुंबाला नवीन कपडे, मिठाई व फटाके भेट दिले़. अनाथांच्या या अनपेक्षित भेटीने गायकवाड कुटुंब भावुक झाले़. ज्यांचा कुणी स्वीकार करायला तयार नाही अशा मुला-मुलींना आम्ही आमच्या अनाथालयाच्या कुटुंबात सहभागी करून घेतो़ दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे पालनपोषण तसेच शिक्षण करतो़. या आश्रमातील तीन मुलींचे विवाह झाले असून त्या आनंदाने सासरी नांदत आहेत़. जवळपास दहा ते अकरा प्रकारचे व्यंग घेऊन जन्माला आलेल्या एका सात दिवसांच्या मुलीला रूग्णालयात सोडून देण्यात आले होते़. चार वर्षापूर्वी तिला आश्रमात आणून तिच्यावर प्लास्टिक सर्जरीच्या सात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे, असे साईआश्रमाचे गणेश दळवी यांनी सांगितले. 

टॅग्स :shirdiशिर्डीSocialसामाजिक