चाइल्ड लाइनच्या सतर्कतेमुळे रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:12+5:302021-08-13T04:25:12+5:30
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना याबाबत चाइल्ड लाइनकडून माहिती ...

चाइल्ड लाइनच्या सतर्कतेमुळे रोखला बालविवाह
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना याबाबत चाइल्ड लाइनकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांची समजूत घातली. अल्पवयीन मुलीचा विवाह करणे हे कायद्याच्या विरोधात आहे. याची माहिती त्यांना देत त्यांचे समुपदेशन केले. मुलीच्या वडिलांना हे सर्व मान्य झाले. त्यांनी मुलीचा विवाह ती सज्ञान झाल्यानंतर करणार असल्याचे सांगत, बालविवाह करणार नसल्याचे लेखी दिले आहे. त्यामुळे हा विवाह रोखण्यास आम्हाला यश आल्याचे चाइल्ड लाइनचे सदस्य आणि उडान बालविवाह प्रतिबंधक चळवळीचे जिल्हा समन्वयक प्रवीण कदम यांनी सांगितले.
---------------
अल्पवयीन मुला-मुलींचा बालविवाह करणे हे कायद्याने गुन्हा आहे. संगमनेर उपविभागात कुठेही बालविवाह होत असल्याचे कुठल्याही नागरिकाला समजल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासन, चाइल्ड लाइनला कळवावे. माहिती देणाऱ्या नाव गुप्त ठेवण्यात येईल.
राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग.