कुपनलिकेच्या खड्ड्यात पडला बालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 14:12 IST2017-05-15T14:12:33+5:302017-05-15T14:12:33+5:30
तालुक्यातील मुर्शतपूरच्या देवकर वस्तीवर कुपनलिकेच्या खड्ड्यात साई प्रमोद बारहाते (वय ७) हा मुलगा सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास पडला़

कुपनलिकेच्या खड्ड्यात पडला बालक
आॅनलाईन लोकमत
कोपरगाव (अहमदनगर), दि़ १५ - तालुक्यातील मुर्शतपूरच्या देवकर वस्तीवर कुपनलिकेच्या खड्ड्यात साई प्रमोद बारहाते (वय ७) हा मुलगा सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास पडला़ जवळपास २० ते २५ फूट खोलवर तो अडकला असून, त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत़ अहमदनगर येथील एनडीएच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे़ घटनास्थळी तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, माजी सभापती सुनील देवकर यांच्यासह प्रशासन दाखल झाले आहे़ ही घटना परिसरातील लोकांना समजताच तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे़