मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केले दहिगावचे पशुधन अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:07 IST2017-12-06T12:07:08+5:302017-12-06T12:07:44+5:30

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. बी. निकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Chief Executive Officer suspended Livestock Officer dahigoan | मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केले दहिगावचे पशुधन अधिकारी निलंबित

मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केले दहिगावचे पशुधन अधिकारी निलंबित

कोपरगाव : तालुक्यातील दहिगाव बोलका येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. बी. निकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी निकाळे यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. एस. बी. निकाळे यांच्यावर शासकीय सेवेत गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निकाळे यांच्याविरोधात अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांची खात्यांतर्गत चौकशी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चौकशीत निकाळे दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: Chief Executive Officer suspended Livestock Officer dahigoan