शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छिंदमची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आरोपी भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आरोपी भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सलग सुट्यांमुळे पोलीस त्याला न्यायालयात हजर करू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या विनंतीवरून न्यायालयाने ही मुदतवाढ दिली. आता १४ दिवसांनंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल.छिंदम याने १६ फेब्रुवारीला महानगरपालिकेच्या कर्मचा-याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचे पडसाद शहरात उमटल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच दिवशी रात्री अटक केली. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले होते.त्याच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत दि. २८ फेब्रुवारीला संपत असल्याने त्याला १ मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाणार होते. परंतु होळी, धुुलीवंदन या सलग सुट्यांमुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर न करता न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ देण्याचा विनंती अर्ज सादर केला. त्यामुळे आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर दि. १५ मार्चला छिंदमला न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, छिंदमचे वकीलपत्र अद्याप कोणत्याच वकिलाने घेतलेले नाही. पोलिसांनी छिंदमविरोधात समाजात तेढ निर्माण करणे हे वाढीव कलम लावल्याने पुढील तारखेस पोलिसांकडून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमBJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज