दौंड महामार्गावरील चिखली घाटात भिषण अपघात : तिघे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:03 IST2018-09-26T14:42:07+5:302018-09-26T15:03:59+5:30
नगर-दौंड महामार्गावर चिखली घाटाजवळ कार-टँकरचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये चिंचोडी पाटील येथील तिघे जण जागीच ठार झाले.

दौंड महामार्गावरील चिखली घाटात भिषण अपघात : तिघे जागीच ठार
श्रीगोंदा / चिचोंडी पाटील : नगर-दौंड महामार्गावर चिखली घाटाजवळ कार-टँकरचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये चिंचोडी पाटील येथील तिघे जण जागीच ठार झाले. आज दुपारच्या १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
नगर - दौंड राष्ट्रीय महामार्गावर चिखली घाटाजवळ झालेल्या मारुती स्विफ्ट व हायवा ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील परिसरात तिघे जण जागीच ठार झाल. या अपघातात अशोक पवार(चिंचोडी पाटील ता.नगर), सागर दहातोंडे (रा.साले वडगाव ता. आष्टी जि.बीड), उन्मेष मोरे (रा.आठवड ता. नगर) हे तिघेजण जागीच ठार झाले. तिघे जण मारुती स्विफ्टमधून दौंडकडे जात होते. चिखली घाटाजवळ रस्त्याच्या कामासाठी मुरुम वाहतुक करणा-या ट्रकला समोरून वेगात असलेली कार धडकल्याने तिघेही जागीच ठार झाले.