नुकसानग्रस्तांना धनादेशांचे वाटप
By Admin | Updated: October 17, 2016 01:01 IST2016-10-17T00:35:50+5:302016-10-17T01:01:54+5:30
लोणी : कोणत्याही संकटाप्रसंगी सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शिर्डी विधानसभा मतदार संघात घेतली जाते,

नुकसानग्रस्तांना धनादेशांचे वाटप
लोणी : कोणत्याही संकटाप्रसंगी सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शिर्डी विधानसभा मतदार संघात घेतली जाते, सामाजिक बांधिलकीतून दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम घडत आहे़ याचे मोठे समाधान वाटते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लोणी बुद्रुक गावामधील नागरिकांना शासकीय मदतीचे धनादेश शालिनीताई विखे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी जि.प सदस्य रावसाहेब साबळे, पंचायत समिती सदस्य सुभाषराव विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, दिलीप बर्डे, भाऊसाहेब तुकाराम विखे, गणेश विखे आदी याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)