स्वस्त धान्य दुकानाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:26+5:302021-01-04T04:18:26+5:30

श्रीरामपूर : अशोकनगर येथील सुरभी महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याचा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश ...

Cheap grain store | स्वस्त धान्य दुकानाचा

स्वस्त धान्य दुकानाचा

श्रीरामपूर : अशोकनगर येथील सुरभी महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याचा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश नाशिकच्या उपायुक्तांनी कायम ठेवला आहे.

याप्रकरणी ग्रामस्थ संजय राऊत व भारत वैरागर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नाही, धान्य खरेदीची पावती मिळत नाही. एकाच व्यक्तीची दोन नावे धान्य वाटपाच्या यादीत समाविष्ट केल्याचे त्यात म्हटले होते. त्यावरून मंडलाधिकारी तसेच पुरवठा विभागाचे अव्वल कारकून यांना दुकान तपासणीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीत आढळून आलेल्या बाबींचा अहवाल पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

अहवालातील गंभीर आक्षेपानंतर दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. त्या निर्णयाला बचत गटाच्या अध्यक्षा सुमैय्या अजिम पठाण यांनी नाशिक येथील पुरवठा उपायुक्तांकडे आव्हान देत पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. उपायुक्तांनी नगर येथील निकाल कायम ठेवला.

------------

Web Title: Cheap grain store