छायाबाई उघडे कोपरे ग्रामपंचायतीच्या तिसऱ्यांदा सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:23+5:302021-02-26T04:27:23+5:30
तिसगाव : कोपरे (ता. पाथर्डी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छायाबाई भाऊसाहेब उघडे यांची तिसऱ्यांदा, तर नारायण वाघमोडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध ...

छायाबाई उघडे कोपरे ग्रामपंचायतीच्या तिसऱ्यांदा सरपंच
तिसगाव : कोपरे (ता. पाथर्डी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छायाबाई भाऊसाहेब उघडे यांची तिसऱ्यांदा, तर नारायण वाघमोडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी आर.बी. ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नूतन सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात झाली. सरपंचपदासाठी उघडे यांच्या नावाची सूचना सुमन गंगाराम धनवटे यांनी मांडली. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोधची घोषणा केली. रासपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी शंकर मारुती उघडे, मंगल सुरेश वाघमोडे, सोपानराव उघडे, पोपटराव वाघमोडे, पोपटराव उघडे, नाथाभाऊ खरात, जबाजी उघडे, दीपक धनवटे, बाबासाहेब धनवटे, कैलास गायकवाड, रामदास धनवटे, अण्णासाहेब उघडे, मळू बोरुडे, प्रकाश उघडे, कारभारी उघडे, म्हातारदेव उघडे, सदाशिव वाघमोडे, किसनराव आव्हाड, रामदास आव्हाड, तुकाराम ढाकणे उपस्थित होते. ग्रामसेवक सुरेंद्र बर्डे यांनी आभार मानले.