जिल्हाभरात मंत्रोपचारात घटस्थापना

By Admin | Updated: September 26, 2014 00:17 IST2014-09-26T00:03:17+5:302014-09-26T00:17:01+5:30

अहमदनगर : शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.देवीचा जयघोष आणि मंत्रोच्चारातरण्यात आली़

Chattoporty in District | जिल्हाभरात मंत्रोपचारात घटस्थापना

जिल्हाभरात मंत्रोपचारात घटस्थापना

अहमदनगर : शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.देवीचा जयघोष आणि मंत्रोच्चारात घरोघरी घटस्थापना करण्यात आली़
आश्विन शुद्ध एकादशीपासून (गुरुवार,दि़२५) नऊ दिवस देवीचा जागर केला जाणार असून, विजयादशमीला (शुक्रवार,दि़३) नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे़ नवरात्रौत्सवानिमित्त घरोघर मंत्रोच्चारात आणि देवीच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली़ घटस्थापनेसाठी देवीमंदिरांमध्ये महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती़ घट, विड्यांची पाने, परडी, मंडपी, हळदी कुंकू, नारळ, चौरंग, अस्तर असे घटस्थापनेचे साहित्य घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवस उपवास धरले जातात़ गुरुवारी उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग दिसून आली़ शहरातील आठ देवी मंडळांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली असून, नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Chattoporty in District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.