लॉरेन्स स्वामी टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:02+5:302021-05-23T04:21:02+5:30
लॉरेन्स दोराई स्वामी याच्यासह संदीप उर्फ म्हम्या शरद शिंदे, विक्रम आनंदा गायकवाड, बाबा उर्फ भाऊसाहेब सोपान आढाव, संदीप परशुराम ...

लॉरेन्स स्वामी टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल
लॉरेन्स दोराई स्वामी याच्यासह संदीप उर्फ म्हम्या शरद शिंदे, विक्रम आनंदा गायकवाड, बाबा उर्फ भाऊसाहेब सोपान आढाव, संदीप परशुराम वाघचौरे, प्रकाश दशरथ भिंगारदिवे, अर्जुन सबाजी ठुबे व बाळासाहेब रमेश भिंगारदिवे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील आरोपी गायकवाड, आढाव व भिंगारदिवे हे फरार असून स्वामी सध्या जामिनावर बाहेर आहे. या आरोपींनी स्वामी याच्या सांगण्यावरून २० नोव्हेंबर २०२० रोजी भिंगार हद्दीतील छावणी परिषदेच्या वाहन प्रवेश कर नाक्यावर दरोडा टाकून कर्मचाऱ्यांना मारहाण करत रोख रक्कम लुटली होती. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या आरोपींविरोधात पूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या गुन्ह्याचा प्रथम तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी तपास केला. त्यानंतर कर्जत विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तपास करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासात जाधव यांना पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी, सहाय्यक फौजदार डी.डी. शिंदे, आर.एस. भालसिंग, हेड कॉन्स्टेबल एस.एस. सुपकर, पोलीस नाईक एम.डी. मगर यांनी मदत केली.