दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:30+5:302021-09-02T04:45:30+5:30
संगमनेर : घरात ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या एका २५ वर्षीय युवतीचा दोघांनी विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी (दि. २८) सकाळी ...

दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
संगमनेर : घरात ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या एका २५ वर्षीय युवतीचा दोघांनी विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी (दि. २८) सकाळी सव्वादहाच्या सुमारास मालदाड रस्ता येथे घडला. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू यादव खरात (रा. यशोदीप थिएटरजवळ, घुलेवाडी फाटा, संगमनेर), धीरज सोमनाथ ढगे (रा. स्ट्रॉबेरी स्कूल, पुणे-नाशिक बाह्यवळण महामार्गजवळ, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. युवती घरात ऑनलाइन अभ्यास करत असताना खरात आणि ढगे हे दाेघे तिच्या घरी गेले. त्यांनी युवतीचा विनयभंग केला. असे कृत्य करत त्यांनी मारहाण केल्याचे युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक फौजदार शिवाजीराव फटांगरे हे अधिक तपास करीत आहेत.