२० ते २८ जूनदरम्यान नगरमधील वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:38+5:302021-06-16T04:28:38+5:30

पहिल्या टप्प्यात २० जून रोजी नगरकडून पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कोठी चौक येथून-मार्केटयार्ड भाजी मार्केट-महात्मा फुले चौक- सक्कर ...

Changes in the transport route in the city between 20th to 28th June | २० ते २८ जूनदरम्यान नगरमधील वाहतूक मार्गात बदल

२० ते २८ जूनदरम्यान नगरमधील वाहतूक मार्गात बदल

पहिल्या टप्प्यात २० जून रोजी नगरकडून पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कोठी चौक येथून-मार्केटयार्ड भाजी मार्केट-महात्मा फुले चौक- सक्कर चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २२ ते २८ या कालावधीत पुणेकडून नगरकडे येणारी वाहतूक सक्कर चौक येथून टिळकरोड- आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर- नेप्ती नाका- दिल्ली गेट- अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक - एसपीओ चौकमार्गे वळविण्यात येणार आहे.

२२ जून ते २८ या कालावधीत हातमपुरा ते कोठी चौकादरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांचेकडील अधिसूचनेप्रमाणे शहरातील बाजारपेठेत माल खाली करणाऱ्या अवजड वाहनांना चांदणी चौक ते सक्कर चौकादरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. परिवहन महामंडळाच्या एस. टी. बस एसपीओ चौक- पत्रकार चौक- दिल्ली गेटे- नेप्ती नाका - टिळक रोड-सक्कर चौक या मार्गाचा वापर करतील. एसटी बस यांना मार्केट यार्ड चौक ते चांदणी चौकादरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास शहर वाहतूक शाखेकडे १७ जूनपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Changes in the transport route in the city between 20th to 28th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.