वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्षपदी आहेर

By Admin | Updated: July 30, 2014 00:46 IST2014-07-29T23:34:08+5:302014-07-30T00:46:05+5:30

संगमनेर : संगमनेर तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी सतीश आहेर, उपाध्यक्षपदी भारत पडवळ, तर सचिवपदी संजय अहिरे यांची निवड झाली.

Chairman of Newspaper Vendor | वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्षपदी आहेर

वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्षपदी आहेर

संगमनेर : संगमनेर तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी सतीश आहेर, उपाध्यक्षपदी भारत पडवळ, तर सचिवपदी संजय अहिरे यांची निवड झाली.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत जाहीर झालेल्या नूतन कार्यकारिणीत आहेर (अध्यक्ष), पडवळ (उपाध्यक्ष), अहिरे (सचिव), बाळासाहेब पाबळकर (खजिनदार), बाळासाहेब मंडलिक, अण्णासाहेब बांगर, रविंद्र नेहूलकर, दिनेश टकले, सुरेश परदेसी, रविंद्र साळवे (सदस्य), बळवंत कुलकर्णी व प्रभाकर टकले (सल्लागार) यांचा समावेश आहे. प्रा.जवाहर मुथ्था यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कुलकर्णी, टकले, हसनभाई मन्सूरी, रमेश दातीर, जगदीश चांडक, विनोद बूब यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किसन हासे, नरेंद्र लचके, अजय जाजू, संजय साबळे, वसंत वाघ, विजय भिडे, राजा वराट, अनंत पांगारकर, वसंत बंदावणे, किशोर आव्हाड, राजेश जेधे, गोरक्ष नेहे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Chairman of Newspaper Vendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.