शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतच प्रमाणपत्राची मुदत संपली; पात्रता पुन्हा सिद्ध करण्याची नामुष्की 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:21 IST

२०१२, २०१३ मध्ये सीटीईटी/टीईटी पात्र असलेल्यांना यापुढे होणा-या अभियोग्यता चाचणीसाठी पुन्हा टीईटी पास होण्याच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे डीटीएड धारकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नानासाहेब चेडे । दहिगावने : राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात येते. यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई)  सीटीईटी/टीईटी परीक्षा पास असावे लागते. या सीटीईटी/टीईटी प्रमाणपत्राची मुदत ७ वर्ष आहे. त्यामुळे २०१२, २०१३ मध्ये सीटीईटी/टीईटी पात्र असलेल्यांना यापुढे होणा-या अभियोग्यता चाचणीसाठी पुन्हा टीईटी पास होण्याच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे डीटीएड धारकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राज्यातील शिक्षक भरतीप्रक्रिया एक ना अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असते. २०१० साली सीईटीद्वारे शिक्षक भरती सुरू झाली. त्यानंतर मात्र सरकार बदलले तसे शिक्षक भरतीचे नियमही बदलत गेले. संस्था चालकांच्या भूमिकेनेही खलबते झाली. अशातच २०१० नंतर थेट २०१९ मध्ये (९ वर्षांनी) पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकभरतीचे चाक फिरले खरे, मात्र २०२० उजाडले तरीही भरती पूर्ण झालेली नाही. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या अभियोग्यता चाचणीतून मुलाखतीशिवाय शिक्षकांची सप्टेंबर २०१९ निवड यादी लागली. यातही अनेक विद्यार्थी निकषांची शर्यत पार करू न शकल्याने जागा रिक्त राहिल्या. तर मुलाखतीसह भरण्यात येणाºया जागांचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे दहा वर्षांपासूनची शिक्षक भरतीची प्रतीक्षा कायम असलेल्या विद्यार्थ्यांमधून पवित्र प्रणालीही अपवित्र ठरल्याची टीका होत आहे.सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांची अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. तेच सीटीईटी/टीईटी पात्रताधारक पुढील अभियोग्यता चाचणीसाठी अपात्र झाले आहेत. याबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याशी फोनवर विचारणा केली असता हे वास्तव असले तरी याबाबत मला अधिक भाष्य करता येणार नसल्याचे सांगत शासनाच्या मान्यतेशिवाय पुढील अभियोग्यता चाचणी होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.दरवर्षी शिक्षकभरती प्रक्रिया राबवली गेली असती तर सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता. २०१० नंतर २०२० मध्ये शिक्षकभरती होत आहे. अशातच सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची मुदत संपली म्हणून त्यांना अपात्र ठरवणे हा अन्याय आहे, असे महाराष्ट डीटीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षणTeacherशिक्षक