केंद्र सरकार सर्व पातळीवर अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:22+5:302021-06-21T04:15:22+5:30
खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित संकल्प दिन कार्यक्रमात यशोधन कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आमदार कानडे ...

केंद्र सरकार सर्व पातळीवर अपयशी
खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित संकल्प दिन कार्यक्रमात यशोधन कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आमदार कानडे बोलत होते. मालुंजा येथे कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी जालिंदर नानासाहेब बडाख यांच्या कुटुंबीयांना यावेळी एक लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी धनादेशाचा स्वीकार केला.
यावेळी इंद्रनाथ थोरात, बापूसाहेब सदाफळ, कार्लस साठे, विष्णुपंत खंडागळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अभिजित लिपटे, ॲड. समीन बागवान आदी उपस्थित होते.
कानडे म्हणाले, काँग्रेस पक्षाचे देशासाठी गेली १३६ वर्षे त्यागमय योगदान आहे. देशाला काँग्रेसचा विचारच तारु शकतो. आगामी काळात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांचा बीमोड करण्यासाठी राहुल गांधी यांना देशाचे प्रधानमंत्री करण्याचा संकल्प करावा लागेल.
गत दीड वर्षापासून संपूर्ण देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या काळात शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते, असा इशारा राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केला होता; परंतु हा जबाबदारीचा सल्ला न ऐकल्यामुळे देशाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, असे कानडे म्हणाले.
यावेळी बाबासाहेब कोळसे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच प्रेमचंद कुंकुलोल, भरत जगदाळे, सरपंच सोन्याबापू शिंदे, सरपंच राधाकिसन डांगे, सरपंच राहुल जगताप, सरपंच डॉ. रा. ना. राशीनकर, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, शहराध्यक्ष अंबादास निकाळजे, सोमनाथ पाबळे, विष्णुपंत खंडागळे, विलास शेजूळ, सर्जेराव कापसे, राजेंद्र कोकणे, नागेश सावंत, सतीश बोर्डे, सुरेश पवार उपस्थित होते.