सेलिब्रेटींच्या उपस्थित देखावे खुले
By Admin | Updated: September 3, 2014 23:59 IST2014-09-03T23:56:10+5:302014-09-03T23:59:10+5:30
अहमदनगर : भाविकांची गर्दी़़़ढोल-ताशांचा गजर अन् सेलिब्रेटींच्या उपस्थित बुधवारी सायंकाळी प्रमुख गणेश मंडळांच्या देखाव्यांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले़

सेलिब्रेटींच्या उपस्थित देखावे खुले
अहमदनगर : भाविकांची गर्दी़़़ढोल-ताशांचा गजर अन् सेलिब्रेटींच्या उपस्थित बुधवारी सायंकाळी प्रमुख गणेश मंडळांच्या देखाव्यांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले़ बुधवारपासून सर्व मंडळांनी देखावे खुले केले़ देखावे पाहण्यासाठी मंगळवारपासूनच शहरात सायंकाळी सहानंतर मोठी गर्दी होत आहे़ बुधवारी महावीर प्रतिष्ठान, जयश्रीराम तरुण मंडळ, प्रेरणा प्रतिष्ठान, शिवगर्जना, अचानक तरुण मंडळ यासह उपनगरातील मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती़ नेता सुभाष चौकातील जयश्रीराम मंडळाच्यावतीने सादर करण्यात आलेला ‘अंगदाकडून रावणाचे गर्वहरण’ या देखाव्याचे सिनेअभिनेत्री उर्मिला कानिटकर हिच्या हस्ते उद्घाटन झाले़ माणिक चौकातील महावीर प्रतिष्ठानच्यावतीने सादर करण्यात आलेला ‘अस्तित्व हरवलेला माणूस’ या देखाव्याचे दिग्दर्शक व अभिनेते केंद्रार शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन झाले़ विविध मंडळांनी धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक संदेश देणारे आकर्षक देवाखे सादर करत यंदाही वेगळेपण जोपासले आहे़ शंकराचे तांडवनृत्य, पटवर्धन प्रतिष्ठानचा छत्रपती शिवराय जेजुरी गडावर, शिवराज्य भिषेक, संत तुकारामांचे वैकुंठवासी गमन, ग्लोबल वार्मिंग, स्त्रीभ्रूणहत्या आदी देखावे पाहण्यासाठी माठी गर्दी होत आहे़ (प्रतिनिधी)