शेवगाव येथे कृषिदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:42+5:302021-07-02T04:15:42+5:30
शेवगाव : येथील शेवगाव पंचायत समिती व कृषी विभागाच्या वतीने कृषिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीच्या ...

शेवगाव येथे कृषिदिन साजरा
शेवगाव : येथील शेवगाव पंचायत समिती व कृषी विभागाच्या वतीने कृषिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप व पीक स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवी होते. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शामसुंदर कौशिक, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी अधिकारी राहुल कदम, सारंग दुगम, गौतम फाजगे, रामकिसन जाधव, कानिफनाथ मरकड आदी उपस्थित होते.
लहू जायभाय यांनी कृषी दिनाच्या निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल मार्गदर्शन केले. रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये राज्यांतर्गत घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देण्यात आली. जिल्हास्तरीय विजेत्यांमध्ये वरुर येथील शेतकरी आबासाहेब वावरे यांनी प्रथम, तर महेश म्हस्के यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. वावरे यांना दहा हजार तर म्हस्के यांना पाच हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. तालुकास्तरावरील विजेत्या नऊ शेतकऱ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.