मृत्युंजय युवा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:22 IST2021-04-01T04:22:31+5:302021-04-01T04:22:31+5:30
..... ख्रिस्त गल्लीत दूषित पाणीपुरवठा अहमदनगर: येथील ख्रिस्त गल्ली येथे गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना ...

मृत्युंजय युवा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती साजरी
.....
ख्रिस्त गल्लीत दूषित पाणीपुरवठा
अहमदनगर: येथील ख्रिस्त गल्ली येथे गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना जुलाब उलट्यासारखे त्रास होत असून, याबबात महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. परंतु, अद्याप दखल घेतली गेली नाही. मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन नागरिकांची तपासणी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी केली आहे.
.....
मुंगसच्या तावडीतून धामिनीला सोडविले
अहमदनगर: नगर-औरंगाबाद महामार्गावरील शासकीय विश्रामगृह परिसरात बुधवारी दुपारी एका मुंगसाने धामिनीचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, धामिन झाडावर जाऊन बसली. दरम्यान, रवी सोनावणे यांनी सर्पमित्र अकाश जाधव यांच्याशी संपर्क केला. जाधव यांच्यासह सर्पमित्रांचे पथक दाखले झाले व त्यांनी धामिनीला पकडून सोडून दिले.