कोरोनाच्या सावटात रामनवमी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:20 IST2021-04-24T04:20:49+5:302021-04-24T04:20:49+5:30
श्रीरामपूर : हिंदू-मुस्लीमांचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामपूरचे दैवत श्रीराममंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मंदिराचे पुजारी गुरू ...

कोरोनाच्या सावटात रामनवमी साजरी
श्रीरामपूर : हिंदू-मुस्लीमांचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामपूरचे दैवत श्रीराममंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मंदिराचे पुजारी गुरू प्रदीप वाडेकर यांच्या हस्ते पाळण्याची दोरी हलवून राम जन्मोत्सवास प्रारंभ झाला. कोरोनाच्या सावटामुळे मागील वर्षीही यात्रा स्थगित करण्यात आली होती. यावेळी श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद फेसबुकद्वारे शहरवासीयांनी अनुभवला. जन्मोत्सव सोहळ्यापूर्वी गुरू वाडेकर यांनी पारायण केले. मंत्रोच्चाराच्या जयघोषात पाळणा हलवण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली.
श्रीराममंदिरावर यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यातही सजावट केली गेली. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंदिर विश्वस्त समितीच्या अध्यक्षा प्रणिता गिरमे व सचिव दिनेश सूर्यवंशी, रोनक गिरमे, अनिल गिरमे, रमेश झिरंगे, अशोक फोफळे, वृषाली गिरमे, प्रतीक बोरावके, अमोल महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा उत्साहात पार पडला.
यावर्षी रामनवमीची यात्रा स्थगित झाल्यामुळे व्यवहार ठप्प राहिला. बाजारपेठेवर व आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला. यात्रेनिमित्त परराज्यातून येणारे व्यापारी, करमणुकीचे खेळवाले, पाळणेवाले आदींचे आर्थिक नुकसान झाले.
कोरोना संसर्गाने मंदिराचे दरवाजे बंद असल्यामुळे राम भक्तांना बाहेरून दर्शन घ्यावे लागले. शहरातील काळाराम मंदिरावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.