कॅलिफोर्नियात महात्मा फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:19 IST2021-04-12T04:19:34+5:302021-04-12T04:19:34+5:30

प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, केतन ...

Celebrating Mahatma Phule Jayanti in California | कॅलिफोर्नियात महात्मा फुले जयंती साजरी

कॅलिफोर्नियात महात्मा फुले जयंती साजरी

प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, केतन मेहेता (मुंबई), संजय पटेल (अहमदाबाद), सबजीतसिंग (मुंबई), अतुल कुमार (बिहार), विश्‍वनाथन (मुंबई), राजगोपाल (कर्नाटक), वेणू गोपाल (हैदराबाद), सुब्रमन्यम (हैदराबाद), आचार्या (आंध्रप्रदेश) आदी भारतीय नागरिक उपस्थित होते.

प्रा. विधाते म्हणाले, रूढी, परंपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करून दिली. शिक्षणाची मशाल पेटवून सर्व समाजाला प्रकाशमान केले. आज विविध क्षेत्रांत महिला कर्तृत्व गाजवित असून याचे श्रेय महात्मा फुलेंना जाते. महात्मा फुलेंच्या शिक्षण चळवळीने भारताच्या उज्वल भवितव्याची पहाट उगवली. त्यांनी आपले आयुष्य दीन, दलित व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी वाहिले. परदेशात आज भारतीय नागरिक सन्मानाने आपले कर्तृत्व सिध्द करीत असून, याचे श्रेयदेखील महात्मा फुलेंना जात असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

....................

११ फुले जयंती

Web Title: Celebrating Mahatma Phule Jayanti in California

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.