पक्षी अभ्यासक रेव्हरंड फेअरबँक यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:23+5:302020-12-16T04:35:23+5:30

सिद्धार्थनगर कब्रस्थानमधील त्यांच्या समाधीवर फुले अर्पण करुन अभिवादन केले. कॉमेड भैरवनाथ वाकळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ह्यूम ...

Celebrating the birthday of ornithologist Reverend Fairbank | पक्षी अभ्यासक रेव्हरंड फेअरबँक यांची जयंती साजरी

पक्षी अभ्यासक रेव्हरंड फेअरबँक यांची जयंती साजरी

सिद्धार्थनगर कब्रस्थानमधील त्यांच्या समाधीवर फुले अर्पण करुन अभिवादन केले. कॉमेड भैरवनाथ वाकळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ह्यूम मेमोरियलचे रेव्हरंड विद्यासागर भोसले यांनी प्रार्थना करुन सर्वांनी ख्रिस्तवासी रेव्हरंड फेअरबँक यांना फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.

पक्षी अभ्यासक प्राचार्य डॉ.सुधाकर कु-हाडे यांनी फअरबँक यांच्या १८४६ ते १८८९ या कालावधीतील निसर्ग अभ्यासाचा आढावा घेतला.

प्रा.प्रियदर्शन बंडेलू यांनी फेअरबँक यांच्या अहमदनगर

येथील आणि वडाळा बहिरोबा येथील धार्मिक कार्याची माहिती दिली. अहमदनगर पहिली मंडळीचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्यपियर यांनी रेव्हरंड ना.वा.टिळक, रेव्हरंड फेअरबँक आणि अहमदनगर जिल्हयातील उच्चशिक्षणाचे जनक डॉ.भा.पां. हिवाळे उर्फ बाप्पा हिवाळे यांचे ''''नीलफलक'''' त्यांच्या समाधीस्थळी लावण्यात येतील असे सांगितले.

कार्यक्रमासाठी निसर्ग मित्र मंडळाचे व्हि.एम. देवचके, विलास पाटील,

नंदकुमार देशपांडे, राजेंद्रप्रसाद स्वामी, कॉ.रामदास वागस्कर, सुरेश खामकर, राजेंद्र शिंदे, महेंद्र भोसले उपस्थित होते. ऋषिकेष लांडे यांनी आभार मानले.

...

पक्षी विषयक संशोधन

रेव्हरंड फेअरबँक यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे १२५ पक्ष्यांच्या नोंदी करून १८७६ साली त्यास जागतिक किर्तीच्या पक्षी विषयक संशोधन पत्रिकेत प्रसिध्दी दिली होती. या शिवाय महाबळेश्वर, बेळगांव, सह्याद्रीच्या रांगा, तामिळनाडुतील पलानी डोंगर रांगा या परिसरातील पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचा अभ्यासही त्यांनी केला होता. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून तत्कालीन तज्ज्ञांनी काही प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातीला फेअरबँक यांचे नांव दिले असल्याचे पक्षीमित्र डॉ. सुधाकर कु-हाडे यांनी सांगितले.

..

फोटो-१५रेव्हरंड फेअरबँक जयंती

...

Web Title: Celebrating the birthday of ornithologist Reverend Fairbank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.