संतुकनाथ विद्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:14+5:302021-03-16T04:21:14+5:30
निंबळक : नगर तालुक्यातील जेऊर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ...

संतुकनाथ विद्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा
निंबळक : नगर तालुक्यातील जेऊर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
जिल्हा ग्राहक पंचायत कोषाध्यक्ष व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सीताराम बोरुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्राहकांचे हक्क व ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची सविस्तर माहिती बोरुडे यांनी दिली. वस्तू व सेवा यांचा दर्जा, गुणवत्ता, वजन, मूल्यांकन याबाबत ग्राहकांनी जागरूक असावे. तसेच ॲगमार्क व आयएसआय ट्रेडमार्क असणाऱ्या वस्तूच विकत घ्याव्यात. वस्तू विकत घेताना त्याचे बिलही ग्राहकाने विक्रेत्याकडून घ्यावे, असे त्यांनी सांगितले. फसवणूक झाल्यास ग्राहकाने ग्राहक मंचाकडे दाद मागावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राचार्य सुरेश भिंगारदिवे, पर्यवेक्षक भानुदास धुमाळ, सर्व शिक्षक उपस्थित होते.
---
१५ जेऊर