न्यायालय परिसरात वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:25+5:302021-06-26T04:16:25+5:30
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे यांच्याहस्ते १५ फूट उंचीच्या सात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमात ॲड.राजेश ...

न्यायालय परिसरात वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे यांच्याहस्ते १५ फूट उंचीच्या सात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमात ॲड.राजेश कातोरे, ॲड. सुनील तोडकर, ॲड. समीर पटेल, ॲड.निसार शेख, ॲड. स्वाती वाघ, ॲड. दीपाली झांबरे, ॲड. सरिता कोठारी, ॲड. प्रिया काळे, पूनम पंडित आदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना बऱ्हाटे म्हणाले, जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा परिसर मोठा आहे. या परिसराचे सुशोभिकरण व्हावे, यासाठी वकील संघटनेच्यावतीने विविध झाडांचे रोपण करून संवर्धन केले आहे. यात ॲड. येवले यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ॲड. येवले म्हणाल्या, पुरातन काळापासून चालत आलेली वटपौर्णिमा ही परंपरा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. या परंपरेला वृक्षरोपणाची जोड दिली तर पर्यावरण संवर्धन होईल. म्हणूनच हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
फोटो २५ वृक्षरोपण
ओळी-जिल्हा न्यायालय परिसरात वट वृक्षाचे रोपण करत वकील संघटनेच्या माजी महिला सचिव ॲड. अनुराधा येवले यांनी वटपौर्णिमा साजरी केली.