ढवळगावात वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST2021-02-22T04:13:56+5:302021-02-22T04:13:56+5:30

जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांचे निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ओबीसी महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष विजय ...

Celebrate Shiva Jayanti by planting trees in Dhawalgaon | ढवळगावात वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी

ढवळगावात वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी

जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांचे निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ओबीसी महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या वतीने खंडोबा मंदिरासमोर वृक्षारोपण केले.

अगदी साध्या पद्धतीने जयंती साजरी करत असताना, प्रिया लाटे हिने शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.

सानिका खोडदे हिने व्याख्यानाद्वारे शिवचरित्र उलगडून सांगण्याची प्रयत्न केला. यावेळी बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब पानमंद, आर.टी.शिंदे, विजय पवार, गौतम वाळुंज, अनिल वाळुंज, गणेश ढवळे, अमोल बोरगे, गणेश पानमंद, गणेश शिंदे, राहुल बोरगे, दादा ढवळे, गजानन बनकर, सुनील शिंदे, सोन्याबापू बोरगे उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र शिंदे यांनी तर विजय शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Celebrate Shiva Jayanti by planting trees in Dhawalgaon