राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:38+5:302021-02-05T06:31:38+5:30
ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात डॉ.प्रा. सतीश कटके यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती हापसे कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यावेळी बोलताना ...

राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात डॉ.प्रा. सतीश कटके यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती हापसे कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यावेळी बोलताना कटके म्हणाले, राष्ट्रीय मतदार जागरूकता दिवस २५ जानेवारी २०११ पासून साजरा केला जात आहे. नवीन मतदार नोंदणी करणे, सक्रिय मतदारांच्या सहभागास प्राधान्य देणे, मतदार प्रक्रिया सुलभ करणे, तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभाग करून घेणे, एक मत, एक मूल्य याद्वारे प्रत्येक नागरिकास विलक्षण शक्ती प्राप्त झाली आहे. यावेळी स्वयंसेवकांना मतदार एकजूटतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी प्रा. रवींद्र पाटील, प्रा. दादा बंडगर, प्रा. दत्तात्रय कोहकडे, प्रा. गणेश गडाख, प्रा. बापू खिलारी, प्रा. प्रकाश रोकडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब फुलमाळी यांनी केले.