समता स्कूलमध्ये अभिनव उपक्रमातून हिंदी दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:47+5:302021-09-18T04:22:47+5:30
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच ‘जागतिक हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे उपप्राचार्य समीर ...

समता स्कूलमध्ये अभिनव उपक्रमातून हिंदी दिवस साजरा
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच ‘जागतिक हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे उपप्राचार्य समीर अत्तार होते.
स्कूलमधील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील विविध लेखक, कवी, साहित्यिकांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या भूमिकेतून त्या लेखकांची ओळख करून दिली. कुलदीप कोयटे याने मुन्शी प्रेमचंद, उन्नती भवर हिने हरिवंशराय बच्चन, जान्हवी जानी हिने सुभद्राकुमारी चौहान, मृदुला सोनकुसळे हिने संत कबीर, आर्यन कदम याने श्यामसुंदर रावत, खुशी कोठारी हिने मीराबाई यांच्या भूमिका साकारत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. हर्षिता लोकचंदाणी हिने हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. इयत्ता ७ वी तील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून हास्य नाटिका सादर केली, तसेच हिंदी गीतांवर नृत्य सदर केले.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांनी हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन नंदिनी कलंत्री हिने केले. कार्यक्रमासाठी माध्यमिक विभाग प्रमुख शिल्पा वर्मा, हिंदी विभाग प्रमुख अनिता आढाव, शिक्षिका ज्योती घोलप व शिक्षक सुनील साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार शिक्षक सुनील साळुंखे यांनी मानले.
............
फोटो ओळी
समता स्कूलमध्ये अभिनव उपक्रमातून हिंदी दिवस साजरा करण्यात आला.