पानोडी शाळेत चिमणी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:27+5:302021-03-21T04:19:27+5:30
मार्च महिना, रणरणते ऊन या उन्हात चिमण्यांना पाणी व अन्नाची गरज असते. हे ओळखून बालपणाच्या २०० विद्यार्थ्यांनी चिमणी व ...

पानोडी शाळेत चिमणी दिन साजरा
मार्च महिना, रणरणते ऊन या उन्हात चिमण्यांना पाणी व अन्नाची गरज असते. हे ओळखून बालपणाच्या २०० विद्यार्थ्यांनी चिमणी व पक्षांसाठी मोकळी पाणी बाटली, खराब पुठ्ठे, खराब प्लास्टिक या टाकाऊपासून टिकावू असे पाणी व अन्न ठेवता येईल असे बर्ड फिडर बनवत. आम्ही सुद्धा चिमण्यांच्या रक्षणासाठी सज्ज आहोत. पर्यावरण संवर्धन ही आमची जबाबदारी आहे. हे या दिवशी सिद्ध केले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस हा वृक्षारोपण करून आजपर्यंत उभारलेल्या सर्व झाडांना बर्ड फिडर बसवत वृक्ष संवर्धनाबरोबरच पक्षी संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडत आहे. ‘बालपण’च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात उभारलेल्या सह्याद्री देवराईच्या केशरबागेत व शाळेच्या आवारातील सर्व झाडांना पाणी व अन्नधान्यचे बर्ड फिडर बसवून घरून धान्य व आपल्याकडील बाटलीत उरलेले पाणी या चिमण्यांसाठी देत त्याचे संवर्धन करण्याचे काम करत आहे.
या उपक्रमासाठी ‘बालपण’च्या प्रमुख सोनाली मुंढे, जाधव दीपाली, राजश्री बोऱ्हाडे, बालोटे सुचिता, आव्हाड सिमा, गांजवे कावेरी, वंदना घोडेकर, अश्विनी बिडवे, अनाप स्नेहल, भुसाळ, संत अनिता, भोकरे टिचर, कानडे टिचर या सर्व महिला शिक्षकांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
..
२०आश्वी चिमणी डे
...
पानोडी येथील ‘बालपण’च्या शाळेत चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी बर्ड फिडर तयार करुन पशुपक्ष्यांच्या अन्नपाण्याची सोय केली.