सत्ताधारी-विरोधकांची उदासिनता कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:34+5:302020-12-16T04:35:34+5:30
भाग-२ श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरण डाव्या कालव्याखाली ९० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र कालव्यास मिळणाऱ्या ...

सत्ताधारी-विरोधकांची उदासिनता कारणीभूत
भाग-२
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरण डाव्या कालव्याखाली ९० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र कालव्यास मिळणाऱ्या २१ टीएमसी पाण्यात ६ टीएमसी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे डिंबे, माणिकडोह बोगदा जोड प्रकल्प पर्याय पुढे आला आहे. मात्र डिंबे माणिकडोह बोगदा जोड प्रकल्पाचे काम कुकडी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींची ठोस भूमिका नसल्याने दशकापासून रेंगाळत पडला आहे.
कुकडी प्रकल्पाखाली १ लाख ५६ हजार २७८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. यामध्ये आंबेगाव १५ हजार ४१८, जुन्नर २७ हजार ११५, शिरुर १३ हजार ८३७, पारनेर १४ हजार ७४०, श्रीगोंदा ३० हजार ६१६, कर्जत २९ हजार हेक्टर. करमाळा २३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
कुकडीच्या पाण्यावर अनेक राजकीय सत्तांतरे झाली. राजकिय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी आपले व्यक्तीगत हितही साधले. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जीवन मरणाचा मरणाचा ठरणारा डिंबे-माणिकडोह जोड बोगदा प्रकल्पासंदर्भात लोकप्रतिनिधींनी शासनाला घेरले नाही.
......
डिंबे माणिकडोह बोगदा झाला तर नगर-सोलापूर प्रमाणे जिल्ह्माला फायदा होणार आहे. फडणवीस सरकारने टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण ठाकरे सरकारने वेळ काढूपणा चालविला आहे. या विरोधात जनआंदोलन उभारावे लागेल.
-बबनराव पाचपुते, आमदा, श्रीगोंदा.
....
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून डिंबे-माणिकडोह जोड बोगद्याकडे आपण भाजपा-सेना सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. आता ठाकरे सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ हा प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे.
-राहुल जगताप, माजी आमदार.
...
पुणेकरांचा दबाव...
फडणवीस सरकारने ३ हजार ९०० कोटी कुकडी सुधारित प्रकल्प विकास आखाड्यास मान्यता दिली. डिंबे-माणिकडोह जोड बोगद्याचे टेंडर काढण्याबाबत आदेश केले होते. मात्र पुणेकरांच्या दबावाखाली आघाडी सरकार कुकडीच्या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष करते हा अनुभव आहे. अशी परिस्थिती राहिली तर २०२५ ला शिरुर कुकडीचा टेल होणार, असा आरोप माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केला.
..
फोटो-१५ कुकडी नकाशा
...