कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:12+5:302020-12-17T04:45:12+5:30
टाकळी ढोकेश्वर : जुन्नर तालुक्यातील (जि. पुणे) बेल्हेच्या आठवडे बाजारातून बेकायदेशीर १६ छोटी-मोठी जनावरे कत्तलखान्यात नेणारा टेम्पो सोमवारी दुपारी ...

कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडली
टाकळी ढोकेश्वर : जुन्नर तालुक्यातील (जि. पुणे) बेल्हेच्या आठवडे बाजारातून बेकायदेशीर १६ छोटी-मोठी जनावरे कत्तलखान्यात नेणारा टेम्पो सोमवारी दुपारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांच्या हवाली केला. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंबंधी शिवशंकर राजेंद्र स्वामी (रा. शिवाजीनगर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी जनावरांंची बेेकायदेशीर वाहतूक कलमांन्वये आरोपी अलम शरफउद्दीन शेख (वय वय २६, रा. घोडेगाव, ता. नेवासा), जावेद हुसेन सय्यद (वय २७, रा. घोडेगाव), तसेच कत्तलीसाठी जनावरे विक्री करणारा, जनावरे विकत घेणारा व टेम्पोमालक अशा तिघा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.१४) टाकळी ढोकेश्वर येेेेथे टेम्पोत (एमएच- ०९ ईएम ३४१७) लहान-मोठी सोळा जनावरेे आढळून आल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी हा टेम्पो पोलिसांच्या हवाली केला.