शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका जवळ आल्याने राज्यात जातीय दंगली, प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

By अण्णा नवथर | Updated: June 5, 2023 12:23 IST

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर : "नागपूर येथील एटीएसने राज्यात काही ठिकाणी दंगली होऊ शकतात, अशी माहिती दिलेली होती. मात्र सरकारनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. राज्यामध्ये ठिकठिकाणी दंगली झाल्या. आगामी निवडणुका जवळ आल्याने हे प्रमाण आणखी वाढेल," अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नगर येथील पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सोमवारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "शेवगाव येथील दंगलीमध्ये ज्यांचे काही कारण नाही, त्यांनाही घेण्यात आले असून  हे योग्य नाही. याबाबत पोलीस अधीक्षकांशी अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली," असं त्यांनी नमूद केलं. राज्यात जातीय दंगली वाढत आहेत, याबाबत पत्रकारांनी विचारले असता आंबेडकर म्हणाले, की, "राज्यात  ठिकठिकाणी दगली होणार आहेत, अशी शक्यता नागपूर एटीएस व्यक्त केलेली होती. परंतु याबाबत सरकारने गांभीर्याने पावले उचलली नाहीत. ठिकठिकाणी दंगली घडलेल्या आहेत आणि यापुढे त्या घडतील, अशी शक्यता आहे," असे आंबेडकर म्हणाले.

आयते मिळाल्याने त्यांची ही भाषा"राजकारणामध्ये आयते मिळाली की अशी भाषा बोलली जाते. कारण कष्ट करून मिळाले मिळालं तर एकमेकांबद्दल आदर असतो ते लोक असे बोलत नाहीत. परंतु ज्यांना आयते मिळते ते अशी भाषा वापरतात," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह इतरांवर केली.तपासाच्या घेऱ्यात असणारेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदारराज्यातील महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठीचे दावे प्रतिदावे सुरू आहेत, याबाबतही त्यांना सवाल करण्यात आला. "महाविकास आघाडीमध्ये जे जे तपासाच्या घेण्यात आहेत ते मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.नगरच्या नामांतराचे स्वागतच पण... "अहमदनगर शहराचे नाव अहिल्यादेवी होळकर केले, हे काही गैर नाही. परंतु त्यांची एक एकच बाजू समोर आणली जात आहे. त्यांची दुसरी बाजू ही समोर यायला हवी त्या लढाऊ वृत्तीच्या होत्या. तसेच त्यांचे प्रशासकीय व्यवस्थापन देखील अत्यंत उत्कृष्ट होतं. त्यांचा हा इतिहास देखील समोर आणायला हवा,"अशी आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर