जात हीच मोठी अंधश्रद्धा आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:41+5:302021-06-19T04:14:41+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग आणि सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग यांच्यावतीने आयोजित जातपंचांची मनमानी या विषयावर त्या बोलत ...

जात हीच मोठी अंधश्रद्धा आहे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग आणि सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग यांच्यावतीने आयोजित जातपंचांची मनमानी या विषयावर त्या बोलत होत्या.
गवांदे म्हणाल्या, प्रचलित न्यायव्यवस्थेला प्रती आव्हान ठरू शकेल, असे त्यांचे अन्यायकारक न्यायनिवाडे सुरू असतात. आपल्याच जाती बांधवांचे विविध प्रकारे प्रचंड शोषण करणारी ही क्रूर जमात त्या-त्या जाती-पोटजातीत आजही कार्यरत आहे. महाराष्ट्र अंनिसने प्रथमच समाजासमोर ही जाती-पोटजातीतील अन्यायकारक न्यायनिवाडे करणारी व्यवस्था महाराष्ट्रातील जनमाणसासमोर उघडकीस आणली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत होऊन तो ३ जुलै २०१७ ला प्रत्यक्ष अंमलात आला. आजपर्यंत या कायद्या अंतर्गत विविध जाती- धर्मातील जातपंचांविरोधात १२२ गुन्हे दाखल झाले आहेत.
प्रास्ताविक कृष्णा चांदगुडे (नाशिक) यांनी केले. वक्ता परिचय व स्वागत सुप्रिया जेधे( रायगड) यांनी केले. प्रश्न वाचन कविता राठोड (वर्धा) यांनी करत सूत्रसंचलन तृप्ती थोरात (सांगली) यांनी केले. ललिता दरेकर (लातूर) यांनी आभार मानले.