माजी आमदार राठोड यांच्यासह दोघा माजी महापौरारांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:27 IST2020-06-18T20:27:21+5:302020-06-18T20:27:28+5:30
अहमदनगर: चीन विरोधात आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांसह एकत्र जमल्याने माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह त्यांचा मुलगा विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर आदींसह 20 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार राठोड यांच्यासह दोघा माजी महापौरारांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर: चीन विरोधात आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांसह एकत्र जमल्याने माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह त्यांचा मुलगा विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर आदींसह 20 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र जमण्यास मनाई आहे. राठोड यांनी व इतरांनी शासनाची परवानगी न घेता एकत्र जमून आंदोलन केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, माजी नगरसेवक सुरेश तिवारी, संतोष गेनप्पा यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.
चिनी हल्ल्यात २० भारतीय जवान शहिद झाले. या घटनेच्या दुसºया दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी नगर शहरातील दिल्लीगेट समोर आंदोलन केले. चिनी साहित्याची होळी करून चिनचा निषेध केला होता. हे आंदोलन करताना शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे तसेच जमानबंदी आदेशाचे उल्लंघन केले.