अपंग प्रमाणपत्र प्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्याचीच चौकशी करा

By Admin | Updated: June 24, 2014 00:02 IST2014-06-23T23:27:11+5:302014-06-24T00:02:07+5:30

अहमदनगर: बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निर्दोष ठरविणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याचीच चौकशी करावी अशी मागणी

In case of handicap certificate, inquire about the 'official' officer | अपंग प्रमाणपत्र प्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्याचीच चौकशी करा

अपंग प्रमाणपत्र प्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्याचीच चौकशी करा

अहमदनगर: बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निर्दोष ठरविणाऱ्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याचीच चौकशी करावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नगर जिल्हा परिषदेतील ७६ प्राथमिक शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी अपंगांची बनावट प्रमाणपत्रे प्रशासनाला सादर केली होती. जिल्हा रुग्णालयानेच ही प्रमाणपत्रे बनावट ठरवलेली असताना तसेच या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल असताना नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने ४८ शिक्षकांना निर्दोष ठरविले हे आश्चर्यकारक आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी काही शिक्षकांना मात्र दोषी ठरविले आहे. एकाच प्रकरणी वेगवेगळा न्याय कसा? या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यानेच ‘अर्थपूर्ण’ संबंधातून अहवाल दिल्याचा संशय आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशी अधिकाऱ्याचीच मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे, शहराध्यक्ष विजय हजारे, बाबासाहेब महापुरे, राजू भैरी, मधुकर घाडगे, दत्तात्रय महानोर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे राज्यात अनेक ठिकाणी मूळ अपंगांवर अन्याय करण्यात येत आहे. अशा गंभीर प्रकरणात चौकशी अधिकारी मनमानी करुन आर्थिक हितसंबंधातून अहवाल देत असतील तर ही लोकशाहीची मोठी थट्टा आहे. त्यामुळे या चौकशी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे पोकळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: In case of handicap certificate, inquire about the 'official' officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.