कारवाई करणारे कर्मचारी घेतायेत काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:15+5:302021-03-04T04:39:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणारे महापालिकेचे कर्मचारी स्वत: मास्क ...

Care should be taken by the staff taking action | कारवाई करणारे कर्मचारी घेतायेत काळजी

कारवाई करणारे कर्मचारी घेतायेत काळजी

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणारे महापालिकेचे कर्मचारी स्वत: मास्क लावून काळजी घेत आहेत. नागरिकही कारवाई होईल, या भीतीने मास्क वापर असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने उघडली आहे. चारही प्रभाग कार्यालयांतर्गत भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, हे पथक चौक, रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने हॉटेल, टपऱ्या, मंगल कार्यालये, महाविद्यालये आदी परिसरांना भेट देऊन गर्दी करणारे व मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. ही कारवाई करताना भरारी पथकातील कर्मचारी स्वत: मास्क वापरत असल्याचे निदर्शनास आले. तसेच महापालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावण्यासाठी गेलेले अधिकारी व कर्मचारीही मास्क वापरत असून, कारवाई करणारे स्वत:ची काळजी घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली होती. काहीजण बरे झाले, तर काहींचा यामुळे जीव गेला. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचारी सावध झाले आहेत, ते मास्क वापरताना दिसतात. अधिकारीही मास्क वापरत असल्याचे दिसते.

....

नागरिकांकडून ३० हजारांचा दंड वसूल

सावेडी- ९४, २०६००

केडगाव-८- ८००

झेंडीगेट- ४४- ४४००

शहर- ९८- ९८००

--

डमी

Web Title: Care should be taken by the staff taking action