दोन वर्षांनंतर पकडला गांजा तस्करीतील आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:56+5:302021-02-05T06:30:56+5:30
२ फेब्रुवारी २०१९ रोजी झरेकाठी येथे सकाळी रस्त्याच्या कडेला काही तरुण उभे होते. यावेळी एमएच १४ जीएच ९९२५ हे ...

दोन वर्षांनंतर पकडला गांजा तस्करीतील आरोपी
२ फेब्रुवारी २०१९ रोजी झरेकाठी येथे सकाळी रस्त्याच्या कडेला काही तरुण उभे होते. यावेळी एमएच १४ जीएच ९९२५ हे चारचाकी वाहन अतिशय वेगाने येताना दिसले. पोलीस निरीक्षक अनिल कटके, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे, शांताराम झोडगे, संजय लाटे, मच्छिंद्र शिरसाठ, एकनाथ बर्वे, पांडुरंग कावरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या वाहनाकडे मोर्चा वळवला. त्यावेळी वाहनातील एकाने उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस निरीक्षक अनिल कटके व हवालदार अनिल शेगाळे यांनी आरोपी गणेश निवृत्ती लोणारे (रा. जोर्वे, ता. संगमनेर) याला पाठलाग करून ताब्यात घेतले होते.
दरम्यान, चालकाने आश्वी बुद्रुक येथील आम्रेश्वर मंदिरालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ गाडीचालकाने गाडी टाकून पलायन केले. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये सुमारे पावने दोनशे किलो गांजा मिळून आला. तपासादरम्यान पोलिसांनी देवराज उर्फ देवा तेजू पवार, सीमा उर्फ गुलाबबाई राजू पंचारिया, जय योगेश्वर उर्फ योगेश दगू उर्फ दत्तू गायकवाड यांना अटक केली होती, तर तब्बल दोन वर्षे कसून शोध घेतल्यानंतर फरार आरोपी स्वप्नील अण्णासाहेब कवडे (वय २९ वर्षे, रा. धांदरफळ, तालुका संगमनेर, हल्ली राहणार गोल्डन सिटी गेट, संगमनेर) याला संगमनेर येथून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वाकचौरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गंभीरे व वाघ यांनी अटक केली आहे.