ऊस दरावर कोंडी फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST2020-12-17T04:44:56+5:302020-12-17T04:44:56+5:30

प्रभारी प्रादेशिक सहसंचालक रामेंद्रकुमार जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर येथे मंगळवारी संघटनांचे पदाधिकारी व कारखानदारांचे प्रतिनिधी यांच्यात बैैठक पार ...

The cane rate did not break | ऊस दरावर कोंडी फुटेना

ऊस दरावर कोंडी फुटेना

प्रभारी प्रादेशिक सहसंचालक रामेंद्रकुमार जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर येथे मंगळवारी संघटनांचे पदाधिकारी व कारखानदारांचे प्रतिनिधी यांच्यात बैैठक पार पडली. यावेळी संघटनांनी हा आरोप केला. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, रघनुथदादाप्रणीत संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे, युवराज जगताप, हरिभाऊ तुवर, बाळासाहेब खर्जुले, संजय वाघ आदी उपस्थित होते.

शेतकरी संघटनांनी चालू गाळप हंगामात निघालेल्या उसाच्या एफआरपीवर (रास्त व किफायतशीर दर) नाराजी व्यक्त केली. कारखान्यांनी ऊसतोडणी वाहतूक खर्चाची वजावट न करता शेतकऱ्यांना एकरकमी पैैसे द्यावेत. उपपदार्थांच्या विक्रीतून तोडणी खर्च भागवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संघटनांनी दरासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखान्याचा त्यासाठी हवाला दिला.

मागील हंगामात बंद असलेल्या कारखान्यांचा एफआरपी मात्र त्यापूर्वीच्या साखर उताऱ्यावर निश्चित करण्यात आला. तो दर अडीच हजार रुपये निघाला आहे. त्यामुळे चालू स्थितीतील कारखान्यांना वाढीव दर का देता येत नाही? असा सवाल यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी मात्र एफआरपी देताना दमछाक होणार असल्याचे सांगितले. सरकारकडे निर्यात अनुदानाचे थकलेले पैैसे, बाजारात पडलेले साखरेचे दर व इतर बाबी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.

-----------

धोकादायक वाहतुकीवर आदेश

जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गांवर सध्या उसाची वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉलीमुळे अपघात होतात. अशा ट्रॅक्टरची कारखान्यांकडे नोंदणी आहे का? तसेच त्यांचा विमा उतरविण्यात आला आहे का? अशी विचारणा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली. सर्व ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावावेत व त्यावरील ध्वनिक्षेपक बंद करावे, असे आदेश आरटीओंनी दिले आहेत.

---------------

शेतकरी संघटना व कारखानदारांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी या बैैठकीचे आयोजन केले होते. कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यासाठी दोन दिवसांत भरारी पथके तैैनात करणार आहोत.

- रामेंद्रकुमार जोशी, प्रभारी प्रादेशिक सहसंचालक,

नगर

-----------

Web Title: The cane rate did not break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.