निघोज येथे कँडल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:07+5:302021-01-25T04:21:07+5:30

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथे कँडल मार्च काढून संदीप वराळ यांना अभिवादन करण्यात आले. चार वर्षांपूर्वी निघोजच्या एसटी ...

Candle march at Nighoj | निघोज येथे कँडल मार्च

निघोज येथे कँडल मार्च

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथे कँडल मार्च काढून संदीप वराळ यांना अभिवादन करण्यात आले.

चार वर्षांपूर्वी निघोजच्या एसटी बसस्थानक परिसरात संदीप वराळ यांची हत्या करण्यात आली होती. ग्रामसभेने संमत केलेल्या ठरावामध्ये दरवर्षी २१ जानेवारी हा काळा दिवस म्हणून राहणार आहे. गुरुवारी (दि.२१) सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत सर्व व्यावसायिक, दुकानदारांनी कडकडीत बंद ठेऊन संदीप वराळ यांना अभिवादन केले. सायंकाळी सात वाजता कँडल मार्च काढण्यात आला.

सत्ता असो वा नसो संदीप वराळ यांच्या सामाजिक विचारांचा वारसा चालवित गोरगरीब जनतेच्या विकासासाठी आपण व आपले सहकारी अहोरात्र मेहनत घेणार असल्याची ग्वाही संदीप वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ यांनी दिली.

यावेळी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, कैलास कोठावळे, अनंतराव वरखडे, सुनील पवार, राजेंद्र लाळगे, दत्तात्रय घोगरे, दत्तात्रय लंके, देवराम वराळ, मंगेश लाळगे, किरण ठुबे, ॲड. संकेत ठाणगे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वरखडे, मंगेश वराळ, ग्रामपंचायत सदस्या शबनूर अस्लम इनामदार, चित्राताई वराळ, जयाताई वराळ, हिराबाई घोगरे, रूपाली गायखे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ २४ निघोज कँडल मार्च

निघोज येथे संदीप वराळ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला होता.

Web Title: Candle march at Nighoj