साठ्यांवर कॅमेराची नजर

By Admin | Updated: May 31, 2014 00:22 IST2014-05-30T23:12:21+5:302014-05-31T00:22:41+5:30

अहमदनगर : वाळूतस्करांना ऐनकेन प्रकारे चाप लावण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

Camera look on the camera | साठ्यांवर कॅमेराची नजर

साठ्यांवर कॅमेराची नजर

अहमदनगर : वाळूतस्करांना ऐनकेन प्रकारे चाप लावण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करीत आहेत. दंड करणे, उपसा करणार्‍या बोटी जाळून टाकणे, गुन्हे दाखल करणे आदी प्रकारे कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही तस्कर वाळूसाठ्यांवर डल्ला मारतात. यावर उपाय म्हणून संगमनेर तालुक्यातील साठ्यावर चक्क सीसीटीव्ही कॅमेरे व फ्लड लाईट लावली आहे. संगमनेरचे प्रांताधिकारी संदीप निचित यांनी ही उपाययोजना केली आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी खमकी भूमिका घेतल्याने वाळूतस्करीला काही प्रमाणात आळा बसला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे वाळू चोरीबाबत बोटचेपे धोरण घेणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांची पंचाईत झाली आहे. या अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे संपूर्ण विभागालाच लोक संशयाने पाहत आहेत. (प्र्रतिनिधी) तस्करी रोखण्यासाठी गस्ती पथक, चेक नाके सुरू केले आहेत. वाळूतस्करी करणार्‍या, तसेच त्यांना साह्य करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार ३७जणांवर गुन्हे दाखल आहेत. २० लाख रूपयांचा दंडही केला आहे. वारंवार सापडणार्‍या वाहनांचा, चालकाचा परवाना रद्द करण्याचा आदेश आरटीओंना दिला आहे. तस्करी रोखण्यासाठी ग्रामस्थांनीही मदत केली पाहिजे. -अनिल कवडे, जिल्हाधिकारी खबर लिक वाळूतस्करीबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांना कर्मचारी आणि तालुकास्तरावरील महसूल अधिकार्‍यांकडून साथ मिळत नाही. बर्‍याचदा छाप्याची माहितीही महसूलमधील खबर्‍यांकडूनच लीक होते. कर्जत तालुक्यातील सीना व भीमा नदीतून अवैध उपसा सुरू आहे. दिघी येथे लिलाव झाला नसताना उपसा केला जातो. गावगुंड तरूण तसेच काही गावपुढारीही तस्करांना सहकार्य करतात. गस्तीपथकाची खबरही ते तस्करांपर्यंत पोहोचवतात. यामुळे वाळूतस्कर पथकाच्या जाळ्यात सापडत नाहीत.

Web Title: Camera look on the camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.