तलवारीने केक कापणे आले अंगलट
By Admin | Updated: June 23, 2016 01:25 IST2016-06-23T00:43:12+5:302016-06-23T01:25:36+5:30
अहमदनगर : वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणे नगरमधील एका तरुणाला चांगलेच अंगलट आले आहे. हातामध्ये तलवार फिरविताना पोलिसांना तो आढळून आला

तलवारीने केक कापणे आले अंगलट
अहमदनगर : वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणे नगरमधील एका तरुणाला चांगलेच अंगलट आले आहे. हातामध्ये तलवार फिरविताना पोलिसांना तो आढळून आला आणि पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. बालिकाश्रम रोडवरील बोरुडे मळ््यात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
तोफखाना पोलिसांची गस्त सुरू असताना बालिकाश्रम रोडवरील सिंधू मंगल कार्यालयासमोर काही तरुण वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र जमले होते. यावेळी वाढदिवसानिमित्त चेतन अमृत हजारे (वय २१, रा. बोरुडे मळा, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, बालिकाश्रम रोड) याने तलवारीने केक कापून ती तलवार हवेत फिरवित असल्याचे पोलिसांनी पाहिले. यावेळी त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पितळी मूठ असलेली एक धारदार तलवार पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामकिसन मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दहशत पसरविण्याच्या उद्देशाने तो तलवार घेवून फिरत होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
(प्रतिनिधी)