१ मे रोजी लोणीत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:20 IST2021-04-22T04:20:08+5:302021-04-22T04:20:08+5:30

राहुरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना २९ मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय ...

Butter agitation on 1st May | १ मे रोजी लोणीत धरणे आंदोलन

१ मे रोजी लोणीत धरणे आंदोलन

राहुरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना २९ मार्चपासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत कायदेशीर मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत मोटारसायकल जाण्यासाठी भुयारी मार्गाच्या ठिकाणाहून तर चारचाकी वाहने जाण्यासाठी रेल्वेच्या लोखंडी पुलाजवळून रस्ता तयार करून देण्यात आला. या ठिकाणी आता रस्ता अत्यंत बिकट झाला. नागरिकांना प्रवास करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे आता भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे स्टेशन येथील गेट सुरू करावे. अथवा पर्यायी रस्ता दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी असून खासदार सुजय विखे यांनी या प्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात. हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा १ मे २०२१ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Butter agitation on 1st May