आढळगावात पुतळ्याचे दहन, कोळगावात बंद
By Admin | Updated: July 20, 2016 00:16 IST2016-07-19T23:36:44+5:302016-07-20T00:16:04+5:30
श्रीगोंदा : कोपर्डी येथील छकुली आमच्या घरातील लेकरू होते. या निरपराध लेकराला हाल हाल करून मारणाऱ्यांना पोलिसांनी मोकाट सोडल्यास आरोपींच्या नरडीचा घोट घेऊ,

आढळगावात पुतळ्याचे दहन, कोळगावात बंद
श्रीगोंदा : कोपर्डी येथील छकुली आमच्या घरातील लेकरू होते. या निरपराध लेकराला हाल हाल करून मारणाऱ्यांना पोलिसांनी मोकाट सोडल्यास आरोपींच्या नरडीचा घोट घेऊ, अशा संतप्त भावना आढळगाव येथील महिलांनी व्यक्त केली
महिला व शाळकरी मुलींनी आरोपींच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गावातून प्रेतयात्रा काढून गांधी चौकात या पुतळ्याला चपलांचा प्रसाद देऊन दहन करण्यात आले. कोपर्डी येथील अत्याचारित छकुलीला श्रध्दांजली अर्पण आली. याप्रसंगी महिला आणि शाळकरी मुलींना भावना आवरता आल्या नाहीत. वृध्द महिलांचे पदर अश्रूंनी ओले झाले.
पंचायत समिती सदस्या अनुराधा ठवाळ म्हणाल्या, घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनात चीड आणि डोळ्यात रक्त उतरल्याशिवाय राहत नाही. सरपंच मीरा वाकडे म्हणाल्या, घडलेली घटना निंदनीय असून या बालिकेवर आलेला प्रसंग डोळ्यासमोर आला तर झोप उडून जाते. ग्रामपंचायत सदस्या सुजाता वाकडे म्हणाल्या, समाजातील अशा प्रकारची विकृती नष्ट करण्यासाठी आता महिलांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
विद्यार्थिनी पल्लवी भोसले म्हणाली, कोपर्डी घटनेने माझ्यासारख्या शेकडो मुलींना आपण असुरक्षित आहोत अशी भावना निर्माण झाली आहे. यावेळी कुंदा जगधने, जयश्री निकम, सुजाता लोणकर, छाया चव्हाण, विजया गव्हाणे, छाया गव्हाणे, सीमा उबाळे, शोभा बंड, लक्ष्मी जाधव, शायरा इनामदार, वैशाली जमदाडे, शुभांगी छत्तीसे, विजया दळवी, प्रिया बोत्रे, शोभा थोरात, कविता सूर्यवंशी, शारदा वाकडे, वंदना पंडित, कविता चव्हाण तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
कोळगावात बंद
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून कोळगाव येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. निषेध सभेत हेमंत नलगे, भैय्या लगड, सुभाष लगड, विश्वनाथ थोरात, विजय नलगे, दादा निर्फळ, नितीन नलगे यांची भाषणे झाली
श्रीगोंदा फॅक्टरीवर बंद
युवकांनी श्रीगोंदा फॅक्टरीवर केलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. श्रीगोंदा फॅक्टरी व ढोकराई येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सभापती अर्चना पानसरे, उपसभापती संध्या जगताप, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ, अॅड. सुनील भोस, राजू पाटील, सुभाष शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सेनेचे घनश्याम शेलार, जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, अनिल ठवाळ यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.
(तालुका प्रतिनिधी)