शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजा उचकटून वस्तीवर चोरी, तिघा आरोपींना अटक 

By अण्णा नवथर | Updated: November 25, 2023 17:38 IST

या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी केला.

अण्णा नवथर, अहमदनगर: शेतात असलेल्या वस्तीवरील घराचा दरवाजा तोडून मारहाण करत सुमारे दोन लाख रुपये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. २४ ) अटक केली आहे. 

अनिकेत विलास हुलावळे ( वय १९ वर्षे, रा. गाड्याचा झाप,पळशी, ता. पारनेर ), गणमळ्या संदील चव्हाण ( रा. वासुंदे ता. पारनेर ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील पळशी येथील प्रभाकर अण्णा गागरे यांच्या वस्तीवर आरोपींनी दरोडा टाकला.  शुक्रवारी (दि. १७) रोजी रात्री दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात प्रभागकर गागरे यांच्यासह कुटुंब झोपलेले हाेते. त्यांना मारहाण करत चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व  काही रोख रक्कम चोरी नेली. याबाबत गागरे यांनी पारनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी केला.

तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा वरील आरोपींनी केल्याचे पुढे आले. आरोपींचा शोध घेत असताना ते पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथे असल्याची माहिती मिळाली.त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने ढाकळीढोकश्वर येथे सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकले. ही कारवाई पोलिस निरिक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पाेलिस उपनिरिक्षक सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी