घरफोडी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:50 IST2018-06-16T16:50:28+5:302018-06-16T16:50:53+5:30
शहरातील विविध भागांत घरफोडी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी तोफखाना पोलिसांनी जप्त केली. तारकपूर बसस्टॅडजवळ वर्दळीच्या ठिकाणी या चोरट्यांनी कपूर कन्स्ट्रक्शन कंपनी या दुकानात चोरी करून तेथील तिजोरी, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.

घरफोडी करणारी टोळी गजाआड
अहमदनगर : शहरातील विविध भागांत घरफोडी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी तोफखाना पोलिसांनी जप्त केली. तारकपूर बसस्टॅडजवळ वर्दळीच्या ठिकाणी या चोरट्यांनी कपूर कन्स्ट्रक्शन कंपनी या दुकानात चोरी करून तेथील तिजोरी, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याशिवाय पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने तेथील सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेले. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासात आय्युब कासम सय्यद (कोठला झोपडपट्टी) व अजयसिंग पोपटसिंग परदेशी (वंजार गल्ली) यांना पकडले. तपासात त्यांचे साथीदार टकलू उर्फ इसरार शेख व वसिम शेख हे अट्टल घरफोडी करणारे गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. यातील आरोपी परदेशी हा कपूर कन्स्ट्रक्शन या दुकानात कामाला होता. त्याचे मालक गावाला गेल्याची संधी हेरून त्याने साथीदारांकरवी या दुकानात चोरीचा कट रचला. यातील आय्यूब सय्यद हा लोखंडी कपाट रिपेअरची कामे करतो. त्यामुळे त्याला दुकान फोडण्यासाठी कटात सहभागी करून घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून हातोडी, कटावणी, अवजड तिजोरी, कार व तिजोरीचा दरवाजा कापण्यासाठी वापरलेली वेल्डिंग मशीन असा एकूण २ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.
तिजोरी नाल्यातून हस्तगत
पुराव नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी चोरलेली तिजोरी व सीसीटीव्ही डीव्हीआर बुरूडगाव येथील नाल्यामध्ये टाकले होते. पोलिसांनी ते या गटारातून हस्तगत केले. यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.