खर्ड्यात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:22 IST2021-02-16T04:22:16+5:302021-02-16T04:22:16+5:30

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे रविवारी रात्री पाच ठिकाणी घराची कुलुपे तोडून चोरी झाली. हा प्रकार सोमवारी सकाळी ...

Burglary at five places overnight in Kharda | खर्ड्यात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या

खर्ड्यात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे रविवारी रात्री पाच ठिकाणी घराची कुलुपे तोडून चोरी झाली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत सायंकाळी पाचपर्यंत जामखेड पोलीस ठाण्यात कुठलीच फिर्याद दाखल झाली नव्हती.

रविवारी रात्री खर्डा शहरातील कसबा गल्ली येथील शेख चाँद अब्दुल शेख यांच्या घरातील नऊ हजारांची रोकड, शुक्रवार पेठेतील सविता बाळासाहेब खरात यांच्या घरातील ४९ हजारांची रोकड चोरांनी लंपास केली. याशिवाय सुर्वे गल्लीतील बाळासाहेब जनार्दन वाळुंजकर, सुरेश राजाराम ढेरे, भगवान बापुराव पन्हाळकर यांच्या बंद घराची कुलुपे तोडून संसारोपयोगी साहित्याची उलथापालथ केली. इतर काही ठिकाणी बंद घराचे कुलुपे तोडण्याचाही प्रयत्न झाला.

शुक्रवार पेठ येथील प्रकाश हरिभाऊ सोनटक्के व जालिंदर हरिभाऊ सोनटक्के यांच्या दुचाकी चोरांनी घरासमोरून नेऊन कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत सोडून दिल्या. काही चोरी झालेल्या घरातील कुटुंबीय बाहेर गावी असल्यामुळे नेमकी किती ऐवज चोरी झाला, हे समजू शकले नाही. पोलीस नाईक संभाजी शेंडे व पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के यांनी तातडीने सकाळी चोरी झालेल्या पाच घरांची भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Burglary at five places overnight in Kharda