दहिगावने, भावीनिमगावात भरदुपारी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:52+5:302021-02-15T04:19:52+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव व दहिगावने येथे भरदुपारी चोरांनी बंद घराचे दरवाजे तोडून ७० हजार रोख व साडेआठ ...

Burglary in Dahigaon, Bhavinimgaon | दहिगावने, भावीनिमगावात भरदुपारी घरफोडी

दहिगावने, भावीनिमगावात भरदुपारी घरफोडी

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव व दहिगावने येथे भरदुपारी चोरांनी बंद घराचे दरवाजे तोडून ७० हजार रोख व साडेआठ तोळे सोने असा ऐवज चोरून नेला. रविवार (दि.१४) दुपारी १ ते ३ च्या वेळेत या घटना घडल्या. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

दहिगावने येथील गोटीराम यशवंत काळे हे कुटुंबांसह कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी १ ते २ च्या दरम्यान घरातील गच्चीचा दरवाजा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटाची व इतर साहित्याची उचकापाचक करून चोरांनी चार तोळे सोन्याचे दागिने व ४५ हजार रूपये व दोन लाखांचा ऐवज लंपास केला.

भावीनिमगाव येथील मनोहर कोंडीराम भापकर हे कुटुंबांसमवेत कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्याच्या येथेही दुपारच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील साडेचार तोळे सोने व २५ हजार रोख असा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब ताके, वासुदेव डमाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Burglary in Dahigaon, Bhavinimgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.