घरफोडी करून पैसे दागिने चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST2021-04-25T04:20:33+5:302021-04-25T04:20:33+5:30
......... वीजपंप चोरला अहमदनगर : कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील शेततळ्यातून चोरट्याने दहा हजार पाचशे रुपयांचा वीजपंप चोरून नेला. ...

घरफोडी करून पैसे दागिने चोरले
.........
वीजपंप चोरला
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील शेततळ्यातून चोरट्याने दहा हजार पाचशे रुपयांचा वीजपंप चोरून नेला. १९ ते २० एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात हनुमंत चंद्रकांत राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल शेख हे पुढील तपास करत आहेत.
.........
खुंटीला बांधलेले तीन बैल चोरले
अहमदनगर : राहाता तालुक्यातील वारी फाटा येथून चोरट्यांनी शेतकर्यांच्या दारासमोर खुंटीला बांधलेले ६० हजार रुपये किमतीचे तीन बैल चोरून नेले. २२ ते २३ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात एकनाथ शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक झिने हे पुढील तपास करत आहेत.
........