........
किचनचा दरवाजा तोडून घरात चोरी
अहमदनगर : राहता तालुक्यातील रामपूरवाडी रोडवरील एकरुखे येथे चोरट्यांनी घराच्या किचनचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १६ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात काशिनाथ दगडू घनघाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा हेड कॉन्स्टेबल सांगळे हे अधिक तपास करत आहेत.
........
दुकान फोडून ऑइल चोरले
अहमदनगर: नगर तालुक्यातील निंबळक येथून चोरट्यांनी दुकान फोडून नऊ हजार रुपयांचे ऑईल चोरून नेले. १५ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयुरेश बाबासाहेब भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल लाळगे हे पुढील तपास करत आहेत.
........
घरफोडी करून दागिने चोरले
अहमदनगर: नगर शहरातील कापड बाजार परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीचे नाणे, जोडवे व तांब्याचे भांडे असा एकूण सात हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १३ ते १६ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात स्वप्निल मोहनलाल गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक पटारे हे करत आहेत.
.......
चोरट्यांनी घरातील भांडी चोरली
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील गाडेवस्ती येथून चोरट्यांनी घरफोडी करून १२ हजार ५०० रुपयांची भांडी चोरून नेली. १६ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शांता लक्ष्मण गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक जाधव हे करत आहेत.
.........
पानटपरी फोडून सिगारेट चोरले
अहमदनगर: पाथर्डी शहरातील नाईक चौक येथे चोरट्यांनी पानटपरी फोडून १४ हजार ५०० रुपये किमतीचे सिगारेट चोरून नेले. १४ ते १५ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अमोल जगन्नाथ उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार गोल्हार हे करत आहेत.