घरफोडी करून पैसे, दागिने चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:20+5:302021-03-04T04:39:20+5:30
------ घराचे कुलूप तोडून चोरी अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे चोरट्यांनी बंदघराचे कुलूप तोडून २६ हजार रुपयाचे दागिने ...

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले
------
घराचे कुलूप तोडून चोरी
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे चोरट्यांनी बंदघराचे कुलूप तोडून २६ हजार रुपयाचे दागिने व पैसे चोरून नेले. २८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात विनायक सीताराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल भिंगारदिवे हे पुढील तपास करीत आहेत.
------------
शिरसगाव येथे चोरट्यांनी मेडिकल फोडले
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे चोरट्यांनी मेडिकल फोडून मेडिसीन, इतर सामान व रोख रक्कम असा एकूण १६ हजार ५१३ रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. १ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गणेश शिवाजी लंघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत.
----------
कामगारांचे मोबाईल, धान्य चोरले
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव शिवारातील नाथाची वाडी येथे चोरट्यांनी पोकलेन मशीनवर काम करणाऱ्या कामगारांचे मोबाईल, कापड, भांडी व तांदूळ असा मुद्देमाल चोरून नेला. १ ते २ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुभाष गुलाब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक तोरडमल हे पुढील तपास करीत आहेत.
-----------
शेतकऱ्याची म्हैस चोरली
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथून चोरट्याने शेतकऱ्याची ३५ हजार रुपये किमतीची एक म्हैस चोरून नेली. १ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात ज्योतिराम बबन वनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल हंचे हे पुढील तपास करीत आहेत.